ट्रीटमेंट चे निकाल
केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट पूर्वीपासून जगभरात इंधन विहिरी (OIL Well) साठी वापरली जाते. पेट्रोलियम पदार्थ किव्हा क्रूड ऑइल काढण्यासाठी मारलेल्या बोअरवेलचे उत्पादन वाढवण्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. स्वर्गीय
श्री. अशोक बगले (भूगर्भशास्त्रज्ञ व ड्रिलिंग अभियंता) आणि श्री. विशाल अशोक बगले (खनिज अभियंता) ह्यांच्याद्वारे विकसित तशीच प्रक्रिया काही वेगळे केमिकल्स तसेच विशिष्ट कॉम्पोजिशन आणि कॉन्सन्ट्रेशन वापरून पाण्याचे
बोअरवेलचे उत्पादन (पाणी) वाढविण्यासाठी केली जाते. सदर प्रक्रिया पूर्णपणे विज्ञान शास्त्र आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानावर आधारित आहे. विशेषतः ही प्रक्रिया फारच सोयीस्कर, कमी खर्चिक व उत्तम निकाल देणारी आहे.

पाण्याची वाढ कधी होते?
ट्रीटमेंट केल्यानंतर दोन दिवस बोअरवेल बंद ठेवले जाते. नंतर पुढे ५ दिवसांनंतर पासून ते महिनाभर पाण्याची वाढ सुरु असते. पाण्याची वाढ ही साधारण ५-६ दिवसांनंतर दिसायला सुरू होते.
कुठल्या बोअरवेल वर ही प्रक्रिया करता येते?
बंद, कोरडे, हंगामी चालणारे, गुळण्या मारणारे व इतर अश्या सर्व नवीन आणि जुन्या बोअरवेल वर ही प्रक्रिया करता येते.
विशेषतः नवीन मारलेल्या प्रत्येक बोअरवेलला ही ट्रीटमेंट करूनच पंप टाकावे असे सुचविले आहे. बोअरवेल मारताना आलेल्या गाळ-मातीमुळे बंद झालेले झरे हे मोकळे होतात आणि बोअरवेलचा दाब कमी होतो. खरे तर फक्त
पाणी वाढविण्यासाठी ल तर घेतलेले बोअरवेल हे भविष्यात उत्तम पाणी देण्यासाठी पूर्णपणे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या तयार आणि करण्यासाठी ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
अनुभवातून ट्रीटमेंट नंतर मिळणारा निकाल
प्रत्येक बोअरवेलला मिळणारा निकाल हा वेगवेगळा असतो. काही बोअरवेल ला फार जास्त पाणी वाढते तर काही बोअरवेलला कमी पाण्याची वाढ होते. प्रत्येक बोअरवेल पॉईंटच्या भूगर्भ रचनेवर त्या बोअरवेलला मिळणार निकाल अवलंबून असतो.
१. चालू बोअरवेल (एक तास किंवा त्यापेक्षा जास्त चालणारे)
साधारण चालू बोअरवेल (ज्या बोअरवेलला पाणी अर्धा – एक तास किंवा त्यापेक्षा जास्त चालते) अशा बोअरवेलला या केमिकल ट्रीटमेंट नंतर पाण्यामध्ये साधारण ४० ते ५० टक्के वाढ ही नक्की होते. म्हणजेच पाण्यात दीडपटीने वाढ होतेच असे मागील निकालावरून आणि अनुभवावरून सांगता येते. उदाहरणार्थ, जर ट्रीटमेंट पूर्वी एका बोअरवेल मधून दिवसभरातून ५०,००० लिटर पाणी मिळत असेल तर ट्रीटमेंट नंतर त्यामध्ये आणखी किमान २०,००० ते २५,००० लिटर पाण्याची वाढ ही नक्की होते. म्हणजेच दिवसभरातून किमान ७०,००० ते ७५,००० लिटर पाणी मिळते.
पाणी वाढीची सोपी मोजमाप पद्धत
चालू बोअरवेलला प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सुरुवातीचे १ ते २ तास पाण्याचे विसर्ग मोजायला सांगितले जाते. एखादे १०० अथवा २०० लिटर चे बॅरल घेऊन पाणी किती मिनिटात भरते याचे मोजमाप करायला सांगितले जाते. तसे प्रत्येक १५ मिनिटाच्या फरकाने एक ते दोन तास शेतकरी मित्रांनी पाण्याचा विसर्ग मोजून सांगायला हवे, जेणेकरून ट्रीटमेंट नंतर पाण्यात झालेली वाढ ही मोजमाप करून बघता येते. बऱ्याचदा एक तास, दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चालणाऱ्या बोअरवेल मध्ये पाण्यात झालेली वाढ ही डोळ्याने दिसून येत नाही. पाण्याची पडणारी धार ही सारखीच वाटते. पण असे मोजमाप केले असल्यास दीड पट म्हणजेच ४० ते ५०% पाण्याची वाढ ही दिसून येते. प्रत्येक शेतकरी मित्रांना सहज जमेल अशी ही साधी मोजमाप पद्धत आहे. असे मोजमाप केले नसल्यास पाण्यात झालेली किंवा न झालेली वाढ लक्षात येत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनी या प्रकारची साधी आणि सोपी मोजमाप करून पहावी ही नम्र विनंती. असे मोल केले असल्यासच सांगितलेले बदल दाखविणे आणि सिद्ध करणे शक्य होते अन्यथा कसलेही निवारण करणे शक्य नाही.
२. कोरडे, फेल अथवा अत्यंत कमी चालणारे बोअरवेल (अर्ध्या तासापेक्षा कमी चालणारे)
ट्रीटमेंट करताना बंद, कोरडे किंवा ५ मिनिटे, १० मिनिटे, २० मिनिटे आणि अर्धा तासापेक्षा कमी चालणारे प्रत्येक बोअरवेल ह्यांना कोरडे बोअरवेल समजूनच ही ट्रीटमेंट केली जाते कारण अशा बोअरवेलचा शेतीसाठी फारसा उपयोग
घेता येत नाही. अशा सगळ्या बोअरवेल मध्ये ट्रीटमेंट केले असता साधारण ७० – ८०% यशस्विता वर्तविता येते. म्हणजेच साधारण १०० मधील ७० ते ८० बोअरवेल हे चालू होतात आणि साधारण १ तास ते ५ तास किंवा त्यापेक्षा जास्त
चालतात. मात्र उर्वरित २० बोअरवेलला काही फरक पडत नाही किंवा अगदी कमी कमी फरक पडतो. अशा २० टक्के बोअरवेलचे जीओलॉजिकल – भौगोलिक जागा चुकलेली असते म्हणजेच पाण्यासाठी आवश्यक असणारी
पाण्यासाठी जट नसते. तेथे या ट्रीटमेंट चा फायदा होत नाही. त्याम ळे अशा सर्व बोअरवेलच्या बाबतीत निकालाची शाश्षती देता येत नाही. या कारणाने २० ते ३० टक्के शेतकरी अपेक्षित निकाल न मिळाल्याने नाराज
होतात मात्र १०० मधील ज्या ७० ते ८० शेतकऱ्यांचे बंद, कमी व कोरडे बोअरवेलचे पाणी हे चांगल्या प्रमाणात वाढलेले असते असे शेतकरी मात्र आनंदी आणि समाधानी होतात. त्यांचे कोरड्या बोअरवेलमुळे होणारे आर्थिक नुकसान थांबते
आणि ता परशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था होते. पुडे नवीन बोअरवेल घेण्यापेक्षा कोरड्या किंवा कमी चालणाऱ्या बो; ही ट्रीटमेंट केलेली कधीही सोयीस्कर ठरते.
३. काही वर्षे चांगले चालून अचानक बंद झालेले
जे बोअरवेल हे काही वर्षे चालून अचानक बंद होतात अशा बोअरवेलला लगेच ट्रीटमेंट दिल्यास सर्रास ९५% बोअरवेल हे पुन्हा सुरु होतात.
४. गुळण्या/उचक्या मारणारे बोअरवेल (बंद चालू बंद / कमी जास्त कमी असे सतत चालणारे)
आता पर्यंत च्या अनुभवावरून आणि निकालावरून असे आढळून आले आहे की गुळण्या मारताना पाणी बंद होण्याचे किंवा कमी फेकण्याचे वेळ हे २ मिनिटांपेक्षा कमी असेल तर सर्रास गॅप र जाते आणि पाणी सतत चालते. जर २ मिनिटांपेक्षा पेक्षा जास्त गॅप असेल तर गॅप घेण्याचा वेळ कमी होतो पण तो पूर्ण पणे निघेल अथवा नाही हे सांगता येत नाही.
सोपे आणि सोयीस्कर प्रक्रिया
जलसंजीवन केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट प्रक्रिया करण्यासाठी पूर्वतयारीची गरज पडत नाही. ट्रीटमेंट करण्यासाठी फक्त १५ मिनिटे ते अर्धा तास लागते. तसेच ट्रीटमेंट करण्यासाठी बोअरवेल मधले पंप, पाईप इत्यादी काढणे
गरजेचे नाही. पंप असेल अथवा नसेल तरीही ट्रीटमेंट करता येते. केमिकलचा पंप आणि इतर साहित्यावर कसलाही अपाय होत नाही. ट्रीटमेंट झाल्यानंतर बोअरवेल (पंप) २ दिवस बंद ठेवावे लागते (पाण्याचा उपसा घ्यावयाचे नाही) आणि २
दिवसानंतर पंप चालवून पाण्यात झालेली वाढ बघू शकतो. ट्रीटमेंट करताना पंप नसल्यास ट्रीटमेंट झाल्यानंतर २ दिवसानंतर पासून पुढे पंप टाकून पाण्यात वाढ बघू शकतो.
ही ट्रीटमेंट म्हणजे बंद व कोरड्या बोअरवेल मुळे शेतकरी मित्रांना होणारे आर्थिक नुकसान पासून वाचविण्यासाठी व असे अनेक निरुपयोगी बोअरवेल मारून जमिनीचा होणारा ऱ्हास व प्रदूषण टाळण्यासाठी आहे.
Let’s work together on your next marketing project
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus
nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.