विशाल बगले यांची ओळख

विशाल बगले यांची ओळख
श्री. विशाल बगले यांनी भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्था म्हणजे I.I.T. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) धनबाद, जे संपूर्ण जगात गेल्या ९० वर्षापासून भूगर्भ शास्त्र निगडित अभ्यासक्रमासाठी नावाजलेले आहे, येथून खनिज अभियंता ही पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली आहे.
त्यांनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकार येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्य केले आहे. त्यांना सायन्स अँड इंजिनीरिंग रिसर्च बोर्ड, भारत सरकार यांचे प्रतिष्ठित फेलोशिप मिळालेली आहे. श्री. बगले यांनी केलेल्या बोअर केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट चा लाभ आज पर्यंत हजारो शेतकऱ्यांनी घेतला आहे व त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळत आहेत